Pune : दौंड येथे रेल्वेच्या डब्ब्याला आग Pune Daund train caught fire | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

train caught fire

Pune : दौंड येथे रेल्वेच्या डब्ब्याला आग

दौंड : दौंड रेल्वे स्थानकात साइडिंगला लावलेल्या रॅक मधील एका रिकाम्या डब्ब्याला आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. सदर रॅक शेजारीच कंटेनरचा रॅक होता परंतु वेळीच आग विझविल्याने आग पसरली नाही.

रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सहा पुढील पुणे बाजूला असलेल्या लोहमार्गावर प्रवासी डब्ब्यांचा एक रॅक साइडिंगला लावलेला आहे. त्यापैकी एक डब्बा ज्यामध्ये विकलांगासाठी राखीव आसन, मालवाहतूक आणि रेल्वे गार्ड कक्ष एकत्र आहे त्याला आग लागली.

आगीची माहिती मिळताच रेल्वे कडून आपत्कालीन परिस्थिती वाजविले जाणारे भोंगे दोन वेळा वाजविण्यात आल्याने यंत्रणा सतर्क झाल्या. दौंड नगरपालिकेच्या अग्निशामक बंबाच्या साह्याने आग विझविण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

आगीमुळे गार्ड डब्ब्यातील विद्युत उपकरणांसह सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. सदर रॅक मध्ये आणि भोवती रेल्वे स्थानकातील कचरा टाकण्यात आला आहे. त्याशिवाय झुडपे वाढलेली असल्याने आगीचा धोका कायम आहे.