esakal | कर्जाला कंटाळून मुलीचा खून ; आई-वडिलांची आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

pune

कर्जाला कंटाळून मुलीचा खून ; आई-वडिलांची आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केडगाव : कर्जाला कंटाळून व्यापारी कुटुंबाने मुलीचा खून करून स्वतः आत्महत्या करून जीवन संपविले. शहरातील केडगाव उपनगरातील अथर्वनगर मध्ये सोमवारी (ता.6) सकाळी ही घटना उघडकीस आली. संदीप दिनकर फाटक (वय 42), किरण संदीप फाटक (वय 32) आणि मैथिली संदीप फाटक (वय 10) असे कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.

संदीप फाटक हे कुटुंब मूळचे सारोळा कासार (ता.नगर) येथील रहिवाशी होते. त्यांचे वडील कामधंद्यानिमित्त केडगाव उपनगरात स्थायिक झाले. संदीप यांचे नगर-दौंड महामार्गावर कायनेटिक चौकात औषधाचे दुकान होते. त्यांचे 2008 मध्ये मामाच्या मुलगी किरण हिच्या समवेत विवाह झाला होता. या दाम्पत्याला मैथिली (वय 10) ही मुलगी होती.

त्यांनी औषधाचे दुकान भाड्याने दिले होते. त्यानंतर एका कंपनीची जिल्ह्याची एजन्सी घेतली होती. या एजन्सीबरोबरच जिल्ह्यातील किराणा दुकानांना साहित्य ते पोहच करत होते. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये त्यांचा व्यवसाय ठप्प झाला होता. त्यामुळे दिवसेंदिवस त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली जात होती.

केडगावातील देवी मंदिर भागातील अर्थवनगर येथे भाड्याने घेतलेल्या घरात होते. फाटक दाम्पत्याने रविवारी (ता. 5) नातेवाईक, मित्र परिवाराला फोन केले. त्यानंतर मुलगी मैथिली हिला फाशी देऊन मारले. त्यानंतर संजय आणि किरण या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

family

family

त्यांच्या एजन्सीमध्ये कामाला असलेला मुलगा सोमवारी (ता.6) सकाळी घरी आला. त्यावेळेस घर बंद होते. त्याने मोबाईलवर संपर्क केला असता रिंग जात होती. परंतु, मोबाईल उचलला जात नव्हता. त्याने खिडकीतून आत डोकावून पाहिले असता मृतदेह पडलेले आढळून आले. त्याने ही माहिती शेजारी राहणाऱ्यांना दिली.

शेजारील रहिवाशांनी ही माहिती कोतवाली पोलिसांना दिली. शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे, कोतवालीचे पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर हे घटनास्थळी आले. या ठिकाणी एक चिट्ठी सुद्धा आढळून आलेली आहे. कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे, असे नमूद केले आहे. या आत्महत्या प्रकरणी कोणालाही दोषी धरू नये, असे ही म्हटलेले आहे. किरण हिच्या हस्ताक्षरातील ही चिठ्ठी आहे. त्यावर दोघांच्या सह्या आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयात तिघांची उत्तरीय तपासणी हे इनकॅमेरा करण्यात आली. डॉक्‍टरांनी तिघांचा ही मृत्यू हा गळफासामुळे झाल्याचे नमूद केले आहे. मुलगी मैथिली हिने आत्महत्या केलेली नाही, तिला गळफास देऊन आई-वडिलांनी खून केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे. त्यामुळे या प्रकरणी आई-वडिलांवर खुनाचा (भादंवि 302) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मैथिली उत्कृष्ठ खेळाडू

मैथिली ही शाळेत हुशार होती. बॅडमिंटन आणि पोहणे या खेळात नैपुण्य मिळविले होते. तिला विविध स्पर्धेत अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. तिच्या घरात ही पारितोषिके ठेवण्यात आली होती. तिच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

loading image
go to top