esakal | Pune: ‘डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठा’चा द्विशताब्दी सांगता बुधवारी
sakal

बोलून बातमी शोधा

डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ

‘डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठा’चा द्विशताब्दी सांगता बुधवारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे :डेक्कन कॉलेज पदव्युत्तर संशोधन संस्थेच्या (अभिमत विद्यापीठ) द्विशताब्दी वर्षाचा सांगता समारंभ येत्या बुधवारी (ता. ६) होत आहे. यानिमित्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आणि केंद्रीय दळणवळण राज्यमंत्री देवूसिंग चौहान यांच्या ऑनलाइन उपस्थितीत ‘डेक्कन कॉलेज’वरील विशेष टपाल तिकीट प्रसिद्ध केले जाणार आहे.

या कार्यक्रमात स्मरणिका, पुस्तक आणि विद्यार्थ्यांतर्फे प्रकाशित होणाऱ्या ई-नियतकालिकाची घोषणा सुद्धा याप्रसंगी केली जाईल अशी माहिती डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद पांडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. सध्या डेक्कन कॉलेजतर्फे प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व, भाषाशास्त्र आणि संस्कृत व कोशशास्त्र या विषयात एम.ए. पदवी प्रदान केली जात आहे. या शिवाय पुरातत्त्व व भाषाशास्त्र या विभागात प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम सुद्धा चालले जातात.

हेही वाचा: सातारा : टाळ, मृदंगात स्वाभिमानीचे सत्याग्रह आंदोलन

अशा अभ्यासक्रमांचा वाढता ओढा पाहता, विद्यापीठाने चार नवीन अभ्यासक्रम सुरू करायचे ठरविले आहे. या नवीन अभ्यासक्रमांना विद्यापीठाच्या विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषदेची मान्यता मिळाली असून राज्य शासनाच्या उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान विभागाच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. या अभ्यासक्रमात कॉम्प्युटेशनल भाषाशास्त्र, वस्तुसंग्रहालयशास्त्र, पर्यावरणीय पुरातत्त्वशास्त्र आणि वारसा स्थळ व्यवस्थापन व वैज्ञानिक संवर्धन विषयातील पदव्युत्तर पदवीचा समावेश आहे. यासोबत समकालीन भारतविद्या संस्था स्थापन करायला डेक्कन कॉलेज पूना ट्रस्टने मान्यता दिली आहे, असेही डॉ. पांडे यांनी सांगितले.

loading image
go to top