

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २५ ः प्रवाशांचा पुणे-दिल्ली विमान प्रवास आता आरामदायक होणार असून, या प्रवासात ‘बिझनेस क्लास’ची (स्ट्रेच क्लास) सुविधा सुरू झाली आहे. यापूर्वीदेखील एका विमान कंपनीने पुण्यातून बिझनेस क्लासची सुविधा सुरू केली होती. आता पुन्हा नव्याने सुरू झाली असून, याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. याचे तिकीट दर प्रतिप्रवासी २५ हजारांपासून आहेत.
पुणे-दिल्ली हा देशातील सर्वात व्यग्र आणि महत्त्वाच्या हवाई मार्गांपैकी एक आहे. या मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. पुणे ते दिल्लीदरम्यान दररोज सुमारे ४६ विमानांची उड्डाणे होतात.
‘स्ट्रेच क्लास’ म्हणजे काय
- स्ट्रेच क्लासमध्ये २-२ आसनव्यवस्था
- प्रवाशांना आरामदायक पद्धतीने बसता येते.
- लॅपटॉप, मोबाईल किंवा टॅब्लेट ठेवण्यासाठी विशेष होल्डर आणि वेगाने चार्जिंगची सोय.
- प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागू नये, यासाठी प्राधान्याने चेक-इन.
पुणे विमानतळ हे देशातील महत्त्वाच्या १० विमानतळांपैकी एक आहे. पुणे-दिल्ली-पुणे या मार्गावर इंडिगोने ही सेवा सुरू केल्याने प्रवाशांना आणखी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.
- अमेय जोशी, हवाई वाहतूक अभ्यासक, पुणे
पुणे-दिल्ली हा देशातील सर्वाधिक वर्दळीच्या अन् प्रवासी संख्येच्या दृष्टीने देशातील सातवा सर्वाधिक व्यग्र हवाई मार्ग आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, उद्योजक, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिक, कॉर्पोरेट क्षेत्रातील व वरिष्ठ शासकीय अधिकारी तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून या मार्गावर अधिक आरामदायी प्रवासाची सातत्याने मागणी होती.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.