Pune : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नामफलकाची दुरूस्ती करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नामफलकाची दुरूस्ती करण्याची मागणी

कोथरूड : कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचा शिखरावरील नामफलक नादुरुस्त झाला आहे. यातील तीन अक्षरांचे दिवे चालू असून उर्वरीत दिवे पेटत नाहीत. त्यामुळे नामफलकावरील वंतरा ही तीन अक्षरेच रात्रीच्यावेळी उठून दिसतात.

नाट्य निर्माता, व्यवस्थापक सत्यजीत धांडेकर म्हणाले की, नाट्यगृह व्यवस्थापन ला बऱ्याच वेळा आठवण करून दिली तरी देखील नाट्यगृह च्या नावाच्या बोर्डाकडे लक्ष नाही, ह्यामध्ये त्वरित लक्ष देऊन बोर्ड लाईट चालू करावी ही आमची अपेक्षाअॅड. शिवाजी भोईटे म्हणाले की, पुण्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या कोथरूडचे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह हे भूषण आहे. सध्या नाट्यगृहात बरीच दुरूस्ती, नूतनीकरण कामे सुरू आहेत. ही कामे करताना इतर नामफलकांची झळाळी राखण्यासाठी जशी काळजी घेतली जात आहे तशी काळजी यशवंतराव चव्हाण नामफलका बाबत घेतली जात नाही असे येथे खेदाने म्हणावे लागेल.

नाट्यगृह सहाय्यक व्यवस्थापक संतोष दुबे म्हणाले की, नामफलकातील दिव्यांची तातडीने आवश्यक ती दुरूस्ती करण्यात येईल.

टॅग्स :Pune Newspunedrama