

Pune Dengue Cases Rise
esakal
पुणे: पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरातील डेंगीचा प्रभाव वाढू लागला आहे. पावसाचे पाणी विविध ठिकाणी साचत असल्याने डासांच्या उत्पत्तीला पोषक वातावरण निर्माण झाले असून, महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून डेंगीच्या संशयित रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जानेवारीपासून १५ जुलैपर्यंत शहरात ४७३ संशयित डेंगी रुग्णांची नोंद झाली आहे. यातील तब्बल ३०० रुग्णांची नोंद जून आणि जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात झाली आहे.