पुण्यात डेंगीचा पहिला बळी

पुण्यात डेंगीचा पहिला बळी
Published on: 

पुणे-लोहगाव, ता. २२ : डेंगीची लागण झाल्यानंतर गुंतागुंत वाढल्याने लोहगाव येथील आठ वर्षांच्या मुलीचा शहरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी (ता. १८) मृत्यू झाला. डेंगीचा शहरातील हा या वर्षीचा पहिला मृत्यू ठरला आहे.
रुबी हॉल क्लिनिक येथे बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत उदावंत यांच्या देखरेखीखाली या मुलीवर उपचार सुरू होते. डॉ. उदावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीला रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात आणण्यापूर्वी चार ते पाच दिवसांपासून ताप आणि पोटदुखीचा त्रास होता. यापूर्वी स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले होते, मात्र ताप आणि पोटदुखी कायम होती. तपासण्यांमध्ये डेंगीच्या संसर्गाची खात्री झाली.
डॉ. उदावंत यांनी मुलीला रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला होता, मात्र घर जवळ असल्याने कुटुंबीयांनी लोहगाव परिसरातील स्थानिक रुग्णालयात उपचार घेतले. तेथे २४ तास उपचार घेतल्यानंतर मुलीची प्रकृती खालावली आणि तिला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर शनिवारी (ता. १७) दुपारी तिला गंभीर अवस्थेत रुबी हॉलमध्ये हलविण्यात आले. त्या वेळी तिचा रक्तदाब अत्यंत कमी झाला होता आणि रक्तातील प्लेटलेट्सची संख्या ५० हजारांपर्यंत घसरली होती. तिला ‘डेंगी शॉक सिंड्रोम’चे निदान करण्यात आले.
डेंगीमुळे रक्ताभिसरण बिघडणे, यकृत आणि मूत्रपिंड यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचे कार्य निकामी झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकने दिली. याबाबत महापालिका आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com