Eknath Shinde
sakal
Pune Latest News: शहराची ओळख ही उद्याने, क्रीडा, पेन्शनरांचे शहर याचबरोबर आयटी, ऑटो हब, पर्यटन नगरी अशी आहे. तसेच गणेशोत्सवासारखे सांस्कृतिक उपक्रम मोठया प्रमाणात होत असल्याने पुण्याचे महत्त्व वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या विकासाचा १२ वैशिष्ट्ये असलेला ‘कृती आराखडा २०२६’ (ब्लू प्रिंट) मांडण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे. पुणे विकास परिषदेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांच्या संकल्पना, अपेक्षा विचारात घेऊन हा आराखडा मांडण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली.