
पुणे : झोपडपट्टी पुनर्विकासात (एसआरए) गैरव्यवहार होऊन विकसकांचाच फायदा झाला होता. आता मात्र मुख्यमंत्र्यांनी ‘एसआरए’संबंधी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्याद्वारे सरकारी जागेवर ‘एसआरए’लाच पुनर्विकास करता येणार आहे. मुकुंदनगर येथे पथदर्शी प्रकल्प केला जाणार आहे. त्यानंतर तो मुंबई वगळता राज्यात लागू केला जाईल. लोकांचा फायदा करण्याचे धोरण सरकारने स्वीकारून जनता वसाहतीत पुनर्विकासाबाबत तोडगा काढला जाणार आहे, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी शनिवारी दिली.