
पुणे : एखाद्या सदनिकेचा अथवा जमिनींचा व्यवहार ठरला....रजिस्ट्रेशनसाठी पैसे भरले....परंतु त्या आधीच तुमचा व्यवहार काही कारणांमुळे झाला नाही....तर भरलेल्या मुद्रांक शुल्काचा परतावा (रिफंड) मिळण्यासाठी अर्ज करण्यापासून ते पैसे मिळेपर्यंत तुम्हाला हेलपाटे मारावे लागतात. आता हा त्रास होणार नाही. कारण भरलेले शुल्क परत मिळण्याचा कालावधी पंधरा दिवसांवर आला आहे. महसूल दिनाच्या निमित्ताने सह जिल्हा निबंधक कार्यालयाकडून ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. राज्यात अशी मोहीम राबविणारे हे पहिले कार्यालय ठरले आहे.