
पुणे : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या प्रश्नासह शहरातील भूसंपादनाअभावी रखडलेल्या रस्त्यांची कामे जलदगतीने मार्गी लावण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. भूसंपादनातील अडथळे दूर करून रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती मिळावी, यासाठी महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने कृती पथक (टास्क फोर्स) तयार केले आहे. त्याद्वारे रस्ता रुंदीकरण करून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.