Sextortion : पुण्यात मुलीकडून नग्न Video Viral करण्याची धमकी; मुलाची आत्महत्या

Sextortion
Sextortion Sakal
Updated on

पुणे : सेक्सटॉर्शन मुळे पुण्यातील धनकवडी येथील एका तरूणाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. अमोल गायकवाड असं या तरूणाचं नाव असून त्याला एका मुलीकडून नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी येत होती. त्याने पैसे पाठवूनही सतत मेसेज येत असल्याने अमोलने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

(Pune Dhankawadi Young Boy Suicide)

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल गायकवाड या तरूणाला एक तरूणी सतत मेसेज करून त्याचे नग्न व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत होती. त्यानंतर अमोलने तिच्या अकाऊंटवर साडेचार हजार रूपये पाठवले. त्यानंतरही तिने जास्तीच्या पैशाची मागणी केली होती.

तिने केलेल्या मेसेजनंतर अमोलने "मै सुसाईड करूंगा" असा परत मसेज तिला केला. त्यानंतरही तिने पैशाची मागणी केली आणि "करो सुसाईड" असा रिप्लाय केला. याच जाचाला कंटाळून त्याने घरात साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला आहे.

Sextortion
Russia Ukraine Crisis: युक्रेनकडून रशियाचा UNमध्ये दहशतवादी म्हणून उल्लेख

याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या व्हॉट्सअप नंबरवरून गुन्हा दाखल केला आहे. तर मुलीचा शोध लागला नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सेक्शटॉर्शनचा प्रकार सध्या वाढला असून यापासून सावधगिरी बाळगणे महत्त्वाचं आहे.

सेक्सटॉर्शन म्हणजे काय?

हा प्रकार सध्या खूप वाढला आहे. एखाद्या सुंदर मुलीकडून फेसबुक रिक्वेस्ट पाठवली जाते. ती स्विकारल्यावर लगेच तिच्याकडून मेसेज येतात आणि व्हिडिओ कॉल करण्याची मागणी होते. व्हॉट्सअप नंबरही घेतला जातो. त्यानंतर व्हिडिओ कॉल येतो. त्यावेळी ती मुलगी नग्न असते. तरूणही याला मोहून व्हिडिओ कॉलवर बोलतात. पण त्यानंतर मुलीकडून हा कॉल रेकॉर्ड केला जातो आणि त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे वसूल करण्यात येतात. त्यामुळे या प्रकारापासून सावध राहणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MNS opposed the Pune Municipal Corporation's proposal to lease prime Kothrud land without a public tender to a welfare foundation.
33 Gunthas, Thousands of Roses, and a Success Story Inspiring Maharashtra Farmers
Krushiratna Anil Meher received the Yash Jeevan Gaurav Award 2026 for excellence in agriculture, rural development, and farmer empowerment.
Pune Crime: Ten Booked After Brutal Assault on Woman and Her Family in Khadki
Marathi News Esakal
www.esakal.com