
शहराच्या वेगवेगळ्या भागात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना
पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागात अल्पवयीन मुलींसह तरुणीवर ओळखीच्या व्यक्तींनी लैंगिक अत्याचार करून त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी हडपसर(Hadapsar), लोणी काळभोर (loni kalbhor) व कोथरूड (kothrud) पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. (Pune Different Areas Sexual Abuse)
हडपसर येथे घडलेल्या घटनेत तरुणाने अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिला लग्नाची मागणी घातली. मात्र तिने लग्नास नकार दिल्यानंतर तिच्या घरात जाऊन लैंगिक अत्याचार केले. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास तिच्यासह आईला मारुन टाकण्याची धमकी दिली होती. दरम्यान, हा प्रकार मुलीने आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन हडपसर पोलिसांनी तेजस दत्तात्रेय निकम (वय २०, रा. गोंधळेनगर, हडपसर) यास बेड्या ठोकल्या.
हेही वाचा: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे विरुध्द आळेफाट्याला रास्ता रोको
लोणी काळभोर परिसरात घडलेल्या घटनेप्रकरणी १५ वर्षीय मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अक्षय पूनम राठोड (रा. कुंजीरवाडी, हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मुलगी १५ वर्षांची असून, आरोपी तिच्या ओळखीचा आहे. होळीच्या सणाच्यावेळी त्याने मुलीवर अत्याचार केले. त्यानंतरही सातत्याने त्याने लैंगिक अत्याचार सुरूच ठेवले. या प्रकरणी पीडित मुलीने तिच्या आईला हा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
हेही वाचा: पुण्यातील 4 धरणांमध्ये मिळून 92 टक्के पाणी साठा
कोथरूड परिसरातही याच स्वरूपाची घटना घडली. १८ वर्षीय मुलीला तरुणाने लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी मुलीने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर साहिल हाळंदे (रा. सुतारदरा, कोथरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही घटनांमध्ये मुली गर्भवती राहिल्यानंतर लैंगिक अत्याचाराचा प्रकार पुढे आला
Web Title: Pune Different Areas Sexual Abuse
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..