Crime
ESakal
पुणे - सरकारी निविदांमधून कामे करणाऱ्या खासगी कंपनीच्या बँक खात्याचा आणि डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केल्याप्रकरणी आरोपी महिला शिक्षिकेसह व्यावसायिकाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. आरोपींशी संबंधित कंपन्यांच्या बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच, या व्यवहारांबाबत वस्तू व सेवा कर विभाग (जीएसटी) आणि अंमलबजावणी संचालनालयाकडूनही तपास सुरू असल्याची नोंद न्यायालयाने घेतली.