Pune News: दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा दिशा कार्यगौरव पुरस्काराने सन्मान

Pune News: मराठी चित्रपट दिग्दर्शकांनी वेगळे विषय हाताळले पाहिजेत- दिग्दर्शक जब्बार पटेल
Pune News
Pune Newssakal

Pune News : मराठी चित्रपट निर्माता दिग्दर्शक भाऊसाहेब क-हाडे यांना प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक जब्बार पटेल व सिनेमा अभ्यासक समर नखाते यांच्या हस्ते दिशा कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.(Latest Marathi News)

यावेळी बोलताना दिग्दर्शक जब्बार पटेल म्हणाले,सिनेमाची छोटी फ्रेम केवळ फ्रेम नसते तर त्यात संपूर्ण जग मावते दिग्दर्शकाला ती दृष्टी असली पाहिजे.दिग्दर्शक निर्मात्यांनी विविध विषय हाताळले पाहिजेत. आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत विषय चित्रपटांतून मांडले पाहिजे.

या माध्यमातून वास्तवाचा वेध घेतला पाहिजे. तर आणि तरच प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतो.

नटसम्राट निळूभाऊ फुले रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमास भाजपा चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ ( नाना) शिवले, उपाध्यक्ष संतोष बाबर, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, गोरख भालेकर, सचिन साठे, अभिनेते पृथ्वीराज थोरात, अभिनेत्री कालींदी निस्ताणे, गायक वैभव शिरोळे आदी उपस्थित होते. (Marathi Tajya Batmya)

सत्काराला उत्तर देताना दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे म्हणाले,  ग्रामीण भाषा, जीवन असे विषय असलेल्या अनेक चित्रपटातून लोकांच्या वेगळ्या संवेदना व त्यांचे जगणे लोकांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय.

कोणताही चित्रपट करताना अडचणी येतातच. मलाही अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, मी त्याला सामोरा गेलो. शेतकरी हा सर्वात सहनशील घटक आहे. तो नेहमी आशेवर जगतो. कधीही उमेद सोडत नाही.

Pune News
Pune : वयोश्री आणि ADP योजनेअंतर्गत सहाय्यभूत साधनांच्या खरेदीसाठी निधी उपलब्ध व्हावा ; सुळे

मीही शेतकरी असल्याने त्याच वाटेने जातो. प्रामाणिकपणाने काम करत राहिल्यास अडचणी नक्कीच दूर होतात. नवनवे मार्ग सापडत जातात. प्रश्न सुटत जातात. चांगली माणसं भेटत जातात. प्रामाणिकपणा आणि माणुसकीची कास सोडायची नाही,

हे मात्र मनाशी ठाम असायला हवे. चित्रपट ही एक कलाकृती असून त्याकडे कला म्हणूनच पाहिले जावे. आशय आणि विषय पक्का असेल तर भाषेचा अडसर येत नाही. चित्रपटातून काय ताकदीने आशय मांडला जातो, त्यावर चित्रपटाचे यश अवलंबून असते.

प्रास्ताविक जगन्नाथ शिवले यांनी केले. सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. राजेश सावंत यांनी आभार मानले.

Pune News
Pune Crime News: परिसरात दहशत राहावी म्हणून तरुणांनी तलवारीने फोडल्या १४ हून अधिक गाड्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com