Pune : क्षयरोगाच्या निदानासाठी पहिली स्वदेशी ‘किट’‘मायलॅब’चा आविष्कार; | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune : क्षयरोगाच्या निदानासाठी पहिली स्वदेशी ‘किट’‘मायलॅब’चा आविष्कार;

पुणे : पहिले स्वदेशी क्षयरोग (टीबी) निदान किट आणि संयंत्राची निर्मिती मायलॅब सोल्यूशन्सने केली असून, भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) परीक्षणानंतर त्याचे अधिकृत अनावरण करण्यात आले आहे. क्षयरोगाबरोबरच निष्‍प्रभ ठरणाऱ्या औषधांचाही ‘पत्ता’ यात कळणार आहे.

क्षयरोग निर्मूलणासाठीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला यामुळे मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. एक मोठी प्रयोगशाळा मायलॅबने जणू एका संयंत्रात आणून ठेवली असून, यामुळे निदान पद्धती अधिक सोपी, सहज आणि किफायतशीर होणार आहे. फोटो डिटेक्ट एमटीबी आरआयएफ ॲण्ड आयएनएच ड्रग्स रेजिस्टन्स किट बरोबरच निदानासाठीचे मायलॅब कॉम्पॅक्ट डिव्हाईस सिस्टीम विकसित करण्यात आली आहे. मायलॅबचे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावल सांगतात, ‘‘एकाच वेळी अनेक समस्यांचे समाधान शोधण्याचे काम आम्ही करत आहोत. निदानाचे वेग वाढविण्याबरोबरच ती अधिक स्वयंचलित आणि एकाचवेळी अनेक चाचण्या करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. देशात आरटी-पीसीआर निदासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा अभाव बघता, तंत्रज्ञानाने परिपूर्ण आणि तेवढीच सुलभ असलेले संयंत्र आम्ही बाजारात आणले आहे.’’ ड्रग रेजिस्टन्स अर्थात औषधे निष्प्रभ होण्याचे प्रमाण पाहता क्षयरोगासाठी कोणती औषधे प्रभावी ठरू शकतात याची चाचणीही या संयंत्राद्वारे केली जाणार आहे.

संयंत्राची वैशिष्ट्ये ः

- क्षयरोगाबरोबरच निष्प्रभ ठरणाऱ्या औषधांचेही निदान

- पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञान,

- स्वयंचलित पीसीआर सेटअप, एकाचवेळी अनेक चाचण्या

- सॉफ्टवेअर द्वारे विश्लेषण आणि नोंदणी

- निदानातील अचूकता ९५ टक्के

- ऑनलाइन रिपोर्ट आणि डेटा स्टोअरेज सिस्टम

संयंत्राचे फायदे..

१) स्वयंचलित आणि अचूक निदान पद्धती

२) कमी जागेत, कमी मनुष्यबळात, अधिक जलद निदान

३) केवळ दोन तासांत निदान

४) कॉम्पॅक्ट डीएक्समध्ये एकावेळी आठ नमुन्यांचे निदान

क्षयरोग ः

दरवर्षी रुग्णांमध्ये होणारी वाढ ः २० लाख

भारतातील रुग्णांचे प्रमाण ः २५ टक्के

मृत्यूदर ः ५ ते १८ टक्के

जगभरातील मृत्यू (सन २०२१) ः १६ लाख

Associated Media Ids : PNE22T08339

टॅग्स :Pune NewspunePlant