पुणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होईना; एकाच दिवशी ८४ जणांचा मृत्यू!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 September 2020

दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील १ हजार ५१२, पिंपरी-चिंचवडमधील ५५७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७९७, नगरपालिका क्षेत्रातील १६० आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील २१ जण आहेत.

पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता. २३) दिवसभरात एकूण ३ हजार ८८६ नवे  कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.  एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील १ हजार ७८९ जण आहेत. बुधवारी दिवसभरात ३ हजार ४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये ८३५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ९५८, नगरपालिका क्षेत्रात २३० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ७४ नवे रुग्ण सापडले आहेत.

ओबीसींच्या कोट्यातून मराठा आरक्षण नको; विरोधी पक्षनेत्यांनी व्यक्त केले मत​

दरम्यान, बुधवारी ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४६ रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवडमधील १५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १४ आणि नगरपालिका क्षेत्रातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही मंगळवारी (ता.२२) रात्री ९ वाजल्यापासून बुधवारी (ता.२३) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील १ हजार ५१२, पिंपरी-चिंचवडमधील ५५७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७९७, नगरपालिका क्षेत्रातील १६० आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील २१ जण आहेत. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता २ लाख १३ हजार ५९८ झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत ५ हजार ९५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये जिल्ह्याच्या बाहेरील २१७ जण आहेत.

आतापर्यंतचे संस्थानिहाय रूग्ण 

- पुणे मनपा - १ लाख ३५ हजार ८१८

- पिंपरी चिंचवड महापालिका - ७२ हजार ४७६

-  जिल्हा परिषद - ३७ हजार ९८

- नगरपालिका क्षेत्र - ११ हजार १३८

-  कॅंटोन्मेंट बोर्ड - ५ हजार १३३

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune district 3886 new corona patients found on 23rd September 2020