अबब! पुणे जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांना ठोठावला तब्बल सव्वा कोटींचा दंड

In Pune district 40,000 people were fined Rs 1 crore and 25 lakh
In Pune district 40,000 people were fined Rs 1 crore and 25 lakh

पुणे  : कोरोना प्रतिबंधासाठी मास्क वापरणे बंधनकारक असूनही याचे उल्लंघन केलेल्या ४० हजार व्यक्तींना दंडाच्या माध्यमातून चांगलाच धडा शिकविण्यात आला आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या सर्व व्यक्तींना मिळून सुमारे सव्वा कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि ग्रामीण पोलीसांनी स्वतंत्रपणे ही दंडाची कारवाई केली आहे. या दंडापोटी वसूल झालेली रक्कम संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीत जमा करण्यात आली आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी १ जूनपासून सुरु करण्यात आली आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रत्येकी किमान ५०० तर, कमाल १ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. दरम्यान, पहिल्या दोन महिन्यातच (जून व जुलै) या नियमाचे सहा हजार ७९९ ग्रामस्थांनी उल्लंघन केले होते. या सर्वांकडून मिळून २० लाख ४७ हजार १५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. 

दरम्यान, आज अखेरपर्यंत म्हणजेच मागील तीन महिन्यांत ४० हजार २५५ ग्रामस्थांनी मास्क वापरण्याचे नियमाचे उल्लंघन केले आहे. या सर्वांकडून एकूण १ कोटी १३ लाख २० हजार ८९० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापैकी ग्रामपंचायतींनी १६ हजार २४२ ग्रामस्थांकडून ५५ लाख २९ हजार ९८० रुपयांचा तर, ग्रामीण पोलिसांनी २४ हजार १३ जणांकडून ५७ लाख ९० हजार ९१० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये सर्वाधिक इंदापूर तालुक्यातील ८ हजार ६०२ तर, सर्वांत कमी वेल्हे तालुक्यातील केवळ ३३० व्यक्तींचा समावेश आहे. ही रक्कम गावांच्याच विकासासाठी वापरता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com