Corona Updates: पुणे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा पाचशेपार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona_Positive

नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही मंगळवारी (ता.१०) रात्री ९ वाजल्यापासून बुधवारी (ता.११) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

Corona Updates: पुणे जिल्ह्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा पाचशेपार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.११) दिवसभरात ५३३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील २१७ जण आहेत. याशिवाय ८१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या २४ तासांत ६ हजार ५७३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, दिवसभरात ‌१६ जणांचा मृत्यू झाला आहे.

यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख २९ हजार ४९० झाली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ११ हजार ८१७ कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ८ हजार १२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ३७७ रुग्णांचा समावेश आहे.

'मी अर्णब गोस्वामींचा चॅनेल पाहत नाही पण...'; काय म्हणाले न्यायमूर्ती चंद्रचूड?

बुधवारी दिवसभरात पिंपरी-चिंचवडमध्ये १२५ , जिल्हा परिषद क्षेत्रात १४७, नगरपालिका क्षेत्रात ४० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात चार नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील आठजण आहेत. पिंपरी-चिंचवड २ जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ५ आणि नगरपालिका क्षेत्रातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज कॅंटोन्मेंट क्षेत्रातील एकाही  रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही मंगळवारी (ता.१०) रात्री ९ वाजल्यापासून बुधवारी (ता.११) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top