PDCC Bank : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस आयएसओ मानांकन

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जागतिक स्तरावरील गुणवत्ता व्यवस्थापन आणि उत्कृष्ट कार्यप्रणालीबाबतचे आयएसओ मानांकन मिळाले आहे.
Pune District Central Co-operative Bank Receives ISO Certification
Pune District Central Co-operative Bank Receives ISO Certificationsakal
Updated on

पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जागतिक स्तरावरील गुणवत्ता व्यवस्थापन आणि उत्कृष्ट कार्यप्रणालीबाबतचे आयएसओ मानांकन मिळाले आहे. यापूर्वीही २०१२ साली बॅंकेला पहिल्यांदा आयएसओ मानांकन मिळाले होते. त्याचबरोबर २०१९ साली ही आयएसओ मिळाले होते, आता हे सुधारीत मानांकन प्रमाणपत्र बँकेने अद्ययावत केले असल्याचे बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी सांगितले.

मानांकन प्राप्त झाले त्याप्रसंगी बँकेचे संचालक आणि क्रीडा युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी आमदार रमेश थोरात, रेवणनाथ दारवटकर, भालचंद्र जगताप, रणजित तावरे, प्रविण शिंदे, दत्तात्रय येळे, संभाजी होळकर, निर्मला जागडे, पुजा बुट्टेपाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सरव्यवस्थापक संजय शितोळे तसेच बीएसआय ग्रुप ऑफ इंडियाचे महेश मालपाठक आदी उपस्थित होते.

दुर्गाडे म्हणाले, ‘बदलत्या काळामध्ये वित्तीय प्रणाली, नवी तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या अपेक्षा या बाबीनुसार बँकिंग व सहकार क्षेत्रामध्ये आमूलाग्र असे बदल घडून आलेले आहेत. तसेच या क्षेत्रांमध्ये प्रचंड स्पर्धा ही वाढलेली आहे. २१ व्या शतकातील समृध्द सुदृढ, सक्षम व अग्रगण्य संस्था म्हणून आपले स्थान कायम राखण्यासाठी जिल्हा बँक कार्यरत आहे.

सहकार क्षेत्र हे आर्थिक सेवेचे साधन असून समाजातील तळगाळातील लोकांना आर्थिक दृष्ट्या अधिक समृद्ध आणि सशक्त करण्याचे साधन आहे. जिल्हा बँक अल्प, अत्यल्प भूधारक घटकांना, बचत गटातील महिलांना विचारात घेऊन त्यांची सर्वांगिण उन्नती करण्यासाठी कटिबद्ध आहे. आयएसओ मानांकनाचा बँकेस भावी काळात निश्चितच फायदा होईल.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com