pune district collector jitendra dudi and raju shetty
sakal
घोडेगाव - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखान्यांच्या चेअरमन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक (ता. १ डिसेंबर) सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.