पुणे - राज्यभरातील मतदार पडताळणी मोहिमेत पुणे जिल्ह्याने ४१ टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यातील एकूण ९१ लाख ६० हजार मतदारांपैकी ३७ लाख ६८ हजार जणांची पडताळणी पूर्ण झाली असून, यात बारामती मतदारसंघ आघाडीवर आहे..केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सध्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) ही पडताळणी सुरू आहे. यात २०२५ च्या मतदार यादीची तुलना २००२ च्या यादीशी करण्यात येत आहे. जिल्ह्यात २०२५ च्या यादीनुसार ९१ लाख ५९ हजार ५९८ मतदार असून, आतापर्यंत ३७ लाख ६८ हजार ९७२ (४१.२२ टक्के) मतदारांचे काम पूर्ण झाले आहे. पडताळणीनंतर या मतदारांना चिन्हांकित केले जात असून, हीच यादी अंतिम मानली जाणार आहे..तालुकानिहाय विचार करता बारामतीमध्ये सर्वाधिक ६७.८३ टक्के काम झाले आहे. मावळमध्ये ५९.३१ टक्के पडताळणी झाली असून, चिंचवड मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे २४.४० टक्के काम झाले आहे. हडपसरमध्येही हे प्रमाण २६ टक्के आहे. या दोन्ही मतदारसंघांत मतदारांची संख्या मोठी असल्याने टक्केवारी कमी दिसत अाहे..पडताळणी पूर्ण झाल्यास मतदारांचे नाव यादीत पक्के झाले असे गृहीत धरण्यात येते. त्यामुळे नागरिकांनी ही पडताळणी करून घ्यावी.- मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.