Pune Corona: तिसऱ्या लाटेत पहिल्यांदाच दिवसांत साडे अकरा हजार कोरोनामुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona
Pune Corona: तिसऱ्या लाटेत पहिल्यांदाच दिवसांत साडे अकरा हजार कोरोनामुक्त

Pune Corona: तिसऱ्या लाटेत पहिल्यांदाच दिवसांत साडे अकरा हजार कोरोनामुक्त

पुणे : पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.२५) दिवसभरात नवीन कोरोना रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे. मंगळवारी दिवसांत जिल्ह्यात १० हजार ९८१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट दिवसात ११ हजार ६३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अन्य १२ऐ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील ७ कोरोना मृत्यू आहेत. (Pune District Corona Updates)

दिवसातील जिल्ह्यातील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ५ हजार २७१ नवे रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ३ हजार ५७३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार ६६४, नगरपालिका हद्दीत ३२६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात १५७ नवे रुग्ण सापडले आहेत. एकूण कोरोनामुक्तांमध्ये शहरातील सर्वाधिक ६ हजार २९९ जण आहेत.

हेही वाचा: प्रजासत्ताक दिन : महाराष्ट्राला ५१ पोलीस पदके; संपूर्ण यादी एका क्लिकवर

पिंपरी चिंचवडमधील ३ हजार १५०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ६६७, नगरपालिका हद्दीतील ३२५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील १९७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

पुणे जिल्ह्यातील एकूण मृत्यूमध्ये शहरातील सात मृत्यूबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ३ आणि जिल्हा परिषद व कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी एक मृत्यू आहे.

Web Title: Pune District Corona Updates Drl98

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top