Pune Court: वकील, पक्षकारांची पार्किंगसाठी वणवण; जिल्हा न्यायालय परिसर, आवाराबाहेर गाडी लावल्यास दंडाचाही भुर्दंड
Parking Shortage: पुण्यात जिल्हा न्यायालय परिसरात वाहनतळाची कमतरता; वकिल आणि पक्षकारांना पार्किंगसाठी प्रचंड अडचणी. न्यायालयाच्या आवाराबाहेर गाडी उभी केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला जातो, यात गैरसोय निर्माण.
पुणे : शहरातील वाहतूक कोंडी आणि वाहनतळाची टंचाई थेट न्यायालयापर्यंत पोहोचली आहे. शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालय परिसरात वाहनतळाची पुरेशी सोय नसल्याने दररोज वकील, पक्षकार आणि नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.