मुळशी, भोर, जुन्नरमधील विकासकामांना निधी मंजूर

मुळशी, भोर, जुन्नरमधील 
विकासकामांना निधी मंजूर
Published on

पुणे, ता. १९ ः जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मुळशी, भोर आणि जुन्नर तालुक्यांत विविध विकासकामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पुढाकारातून या कामांना मंजुरी मिळाली आहे.
मुळशी तालुक्यातील जवळगाव येथे अंतर्गत रस्ता विकासकाम तसेच रस्ताळवाडी येथे स्मशानभूमी दुरुस्ती व शेड बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच लवळे येथे सावता माळी मंदिराजवळील अंतर्गत रस्ता आणि भादस येथे विठ्ठल मंदिर ते धोंडीबा गावडे रस्ता कामासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर भोर तालुक्यात खेड शिवापूर प्राथमिक शाळेकडे जाणारा रस्ता, खेड शिवापूर स्मशानभूमी सीमाभिंत तसेच खानापूर येथे स्मशानभूमी संरक्षक भिंत बांधण्यासाठी प्रत्येकी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी येथे धनगरवाडी, नारायणगाव, येडगाव शिवरस्ता विकासकामांसाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Akola News
Pune Water Supply
Why is Mandangad highway project delayed?
Why are Sangli gram panchayat funds stalled?
Marathi News Esakal
www.esakal.com