Pune News : पुणे जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची संख्या आठवरून दहा; जुन्नर, आंबेगावचाही दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश

पावसाच्या खंडामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव या दोन तालुक्यांचाही आता दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश झाला आहे.
drought

drought

sakal

Updated on: 

पुणे - पावसाच्या खंडामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव या दोन तालुक्यांचाही आता दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश झाला आहे. राज्य सरकारने दुष्काळी तालुक्यांची संख्या २६५ वरून ३०५ केली असून, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या आठवरून दहा झाली आहे. यापूर्वी बारामती, शिरूर, दौंड, इंदापूर, पुरंदर, खेड, भोर आणि राजगड या आठ तालुक्यांत दुष्काळी निकष लागू करण्यात आले होते. आता जुन्नर आणि आंबेगावमधील पिकांच्या नुकसानीचेही पंचनामे करण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com