
पुणे : जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे सुमारे शंभर हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला, गहू यांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भागात तातडीने पंचनामे करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या जिल्हा अधिक्षक संजय काचोळे यांनी सांगितले.