माझी वसुंधरा अभियानात पुणे जिल्हा सर्वोत्कृष्ट

Pune
Pune

पुणे : राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियानात पुणे जिल्ह्याने बाजी मारली आहे. या अभियानात पुणे जिल्हा राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या (शनिवारी) पर्यावरणदिनी ऑनलाइन पद्धतीने जिल्ह्याचा गौरव केला जाणार आहे.

मागील वर्षी महात्मा गांधी जयंतीदिनापासून (आॅक्टोबर २०२०) ते ३१ मार्च २०२१ पर्यंत पुणे जिल्ह्यातील १४ नगरपालिका क्षेत्रांमध्ये हे अभियान राबविण्यात आले. नागरिकांनी शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबावी, या उद्देशाने हे अभियान सुरु केले आहे. यानुसार पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती कशी अवलंबावी, याचे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मदतीने लोकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या पंचतत्वांपैकी पृथ्वी तत्त्वानुसार वनीकरण, वनसंवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व जमिनीचे धुपीकरणावर भर देण्यात आला. वायू तत्त्वांनुसार वायुप्रदूषण कमी करून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करणे. जलतत्त्वांनुसार नदी संवर्धन, जलस्रोतांचे संवर्धन व संरक्षण करणे, अग्नी तत्त्वांनुसार ऊर्जेचा परिणामकारक वापर, ऊर्जा बचत आणि ऊर्जेचा अपव्यय टाळण्यास प्रोत्साहन देणे आणि अपारंपरिक ऊर्जेच्या निर्मितीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे आदींचा अवलंब केला. या अभियानांतर्गत महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या जागा, पडीक जमिनी, शेतीचे बांध यांसारख्या जागेचा पुरेपुर वापर करण्यात आला. आकाश तत्त्वानुसार स्थळ व प्रकाश या स्वरूपात निश्चित करून मानवी स्वभावातील बदलांसाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे सर्वसामान्यांमध्ये बिंबविण्याचे काम करण्यात आले.

Pune
पुणे कोणत्या टप्यात अनलॉक? कसे असतील नियम?

जिल्ह्यात राबविलेल्या प्रमुख बाबी
- रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण
- नागरी भागात प्रदूषणविरहित वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न
- जलसंवर्धन, रेन वॉटर हार्वेस्टिंगला प्रोत्साहन
- नद्या, तळी व नाल्यांची स्वच्छता
- सांडपाणी, मैला व्यवस्थापन व प्रक्रिया प्रकल्पांना चालना
- सौरऊर्जेवर चालणारे दिवे, एलईडी दिव्यांचा अधिकाधिक वापर
- हरित इमारतींची संख्या, विद्युत वाहनांना प्रोत्साहन
- निसर्ग संवर्धनासाठी जास्तीत जास्त नागरिकांना शपथ

Pune
Maharashtra Unlock: मुंबईचा समावेश तिसऱ्या गटातच- महापौर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com