पुणे - जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस सुरू आहे. बारामती येथे विक्रमी पाऊस पडल्याची नोंद झाली. बारामती आणि इंदापूर तालुक्यातील १४३ घरांमध्ये पाणी शिरले आहे, तर दौंड आणि खेड तालुक्यात प्रत्येकी एक अशा दोघांचा मृत्यू झाला आहे. .बारामती आणि इंदापूर तालुक्यातील नागरिकांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी सकाळीच नुकसानीची पाहणी सुरू केली होती. इंदापूर तालुक्यातील तब्बल ७२, तर बारामती तालुक्यातील ७१ अशा एकूण १४३ घरांमध्ये ओढ्याचे पाणी शिरले होते. पंचवीस घरांची पडझड झाली..खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण येथे मच्छीमाराचा वीज कोसळून, तर दौंड येथे ज्येष्ठ महिलेचा भिंत पडून मृत्यू झाला आहे, तर काटेवाडी येथील एका घरात ओढ्याचे पाणी शिरल्याने सात जण अडकले होते.या सर्वांना आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुखरूपपणे बाहेर काढले, तर जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व १४३ घरांमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे..दृष्टिक्षेपाततावशी (इंदापूर) - पाण्याने वेढलेल्या घरातून एक व्यक्ती आणि जनावरे सुखरूप बाहेर काढलेजळोची (बारामती) - ओढ्याचा अंदाज न आल्याने रिपेश सिंग (३३) दुचाकीसह वाहून गेला, पण पात्रात अडकून वाचलाजांब (इंदापूर) - बंधाऱ्याचे काम करताना दोन मजूर पोकलेनसह नदीत अडकले; दोघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आलेनारोळी (बारामती) - गाईचा मृत्यू झाला आहे..कालवा फुटला त्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. यासह शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांनी पावसाचा अंदाज पाहून सुरक्षितस्थळी थांबावे.- जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी.पावसाने पळवला काढणीच्या पिकांचा घासपुणे - जिल्ह्यात मागील तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मे महिन्याच्या २५ दिवसांत तब्बल २ हजार ४७ हेक्टरवरील फळे व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या पावसाळी संकटाचा फटका जिल्ह्यातील सुमारे तीन हजार ९०८ शेतकऱ्यांना बसला आहे.पिकांच्या काढणीवेळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची पिके पाण्यात गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. शिवाय मे महिन्यात सुरू झालेला हा पाऊस अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. परिणामी शेतीच्या मशागती खोळंबल्या आहेत. पावसामुळे विशेषतः भाजीपाला, केळी, आंबा, बाजरी आणि काढणीला आलेल्या कांद्याचे उत्पादन थेट शेतातच राहिल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले..परिणामी, शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले. कांदा पावसाने भिजल्याने बाजारात घेऊन जाण्याचीही संधी न मिळाल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. उन्हाळी बाजरीदेखील काढणीसाठी तयार असताना आलेल्या पावसामुळे हातात येणारे उत्पन्न वाया गेले आहे.कृषी विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान खेड तालुक्यात ३५५ हेक्टरवर, इंदापूरमध्ये ३१५ हेक्टर, तर पुरंदर तालुक्यात २८९ हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. जिल्ह्यातील एकूण ५८४ गावांमध्ये हे नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर शासनाने तत्काळ पंचनामे सुरू केले आहेत. हवामान बदलाचा फटका शेतीला बसत असल्याने शेतकरी अधिक चिंताग्रस्त आहेत..जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत महसूल विभागासह कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त पंचनामे करण्यास सुरुवात केले आहेत. सध्या कृषी सहाय्यकांचा संप सुरू असला तरी नैसर्गिक आपत्तीच्या पंचनाम्यांमध्ये कोणतीही दिरंगाई केली जाणार नाही, असे कृषी सहायकांनी सांगितले आहे. त्यामुळे पंचनामे लवकरच पूर्ण होऊन त्याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.