पुणे - इंधन दरवाढ, पशुखाद्याचे वाढते दर आणि दूध उत्पादनात घट अशा संकटग्रस्त परिस्थितीत असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गाय दूधाच्या खरेदी दरात प्रति लिटर एक रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय ३१ जुलैच्या मध्यरात्रीपासून अमलात येणार असून, विक्रीदरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.