
पुणे : कुंडमळा येथील दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जुने पूल, साकव, रस्ते, इमारती, वाडे, जाहिरात फलक, रेल्वे पुलांची येत्या सांत दिवसात ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे अहवाल सादर करावा, असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला.