Pune News : बिनशेती परवानगी आता ऑनलाइन; जिल्हा प्रशासनाचा पुढाकार, लवकरच प्रक्रिया सुरू
Land Conversion Pune : पुणे जिल्ह्यात बांधकाम परवानगीसोबतच बिनशेती आणि गौण खनिज परवानग्या आता ऑनलाइन मिळणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या पुढाकाराने ही सुविधा सुरू होणार असून गैरप्रकारांना आळा बसेल.
पुणे : बांधकाम परवानगी देतानाच गौण खनिज आणि बिनशेती (एन.ए.) परवानगी ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बिनशेती परवानगीसाठी होणारा विलंब कमी होणार असून, त्या माध्यमातून होणारे गैरप्रकारही कमी होणार आहेत.