
पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात बाजी मारली आहे. पुणे जिल्ह्याने सलग दुसऱ्या वर्षी राज्यात आघाडी घेतली. पाचवीतील ६८ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत असून, त्यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील ४७ विद्यार्थी झळकले आहेत. पुणे जिल्ह्यातील दोन्ही वर्गांतील एकूण १२५ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.