Jal Jeevan Mission
sakal
पुणे: जलजीवन मिशनअंतर्गत कामे पूर्ण होऊनही केवळ वीजजोडणीअभावी बंद असलेल्या जिल्ह्यातील १६१ पाणीपुरवठा योजनांना अखेर निधी उपलब्ध झाला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून या योजनांसाठी ११ कोटी १७ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून, कामे अंतिम टप्प्यात आहेत. दरम्यान, आणखी ११४ योजनांसाठी १० कोटी १८ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.