

Public Safety Slabs: Survey and Securing of Hazardous Wells
Sakal
उरुळी कांचन : "भूजल ही सार्वजनिक संपत्ती असून त्याचे संवर्धन करणे ही शासन आणि नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे.सार्वजनिक सुरक्षितता,पर्यावरण संरक्षण आणि भावी पिढ्यांच्या जलसुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे असे लेखी निवेदन देत बकोरी (ता. हवेली) येथील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रकांत गोविंद वारघडे यांनी पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण करून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्याबाबत तसेच बेकायदेशीर व अनियंत्रित बोअरवेल खोदकामावर नियंत्रण आणून भूजल संवर्धनासाठी आवश्यक आदेश निर्गमित करण्याची मागणी केली आहे.