Pune ZP
sakal
मंचर - संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०२५-२६ अंतर्गत विभागस्तरीय स्पर्धेत पुणे जिल्ह्याने दुहेरी यश मिळवत मानाचा तुरा रोवला आहे. जुन्नर तालुक्यातील काळवाडी ग्रामपंचायतीने विभागात प्रथम क्रमांक पटकावत १२ लाख रुपयांचे पारितोषिक मिळविले, तर खेड तालुक्यातील कडाचीवाडी ग्रामपंचायतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणीपुरवठा व पाणी व्यवस्थापन विशेष पुरस्कार आणि ७५ हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.