पुणे विभागातील स्थिती, बाधितांचा आकडा 5 लाख 40 हजारांवर 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 6 December 2020

पुणे जिल्ह्यात कोरोना बाधीत एकूण 3 लाख 46 हजार 345 रुग्णांपैकी 3 लाख 27 हजार 123 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. हे प्रमाण 94.45 टक्के इतके आहे. सध्या 10 हजार 848 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 374 रुग्णांचा मृत्यू झाला असून, हे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे. 

पुणे :  पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पाच लाख 11 हजार 417 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून, हे प्रमाण 94.60 टक्के आहे. विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच लाख 40 हजार 588 झाली आहे. सध्या 14 हजार 66 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, 15 हजार 105 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पुणे जिल्ह्यात कोरोना बाधीत एकूण 3 लाख 46 हजार 345 रुग्णांपैकी 3 लाख 27 हजार 123 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. हे प्रमाण 94.45 टक्के इतके आहे. सध्या 10 हजार 848 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 374 रुग्णांचा मृत्यू झाला असून, हे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे. 

सावधान! Redmi Mi7 प्रो स्वस्तात घेण्याचा फंडा पडला महागात; सायबर चोरट्यांनी गंडवलं

उर्वरित जिल्ह्यातील स्थिती : 

सातारा जिल्हा : 

कोरोनाबाधित रुग्ण : 51 हजार 659 
बरे झालेले रुग्ण : 49 हजार 334 
उपचार सुरू असलेले रुग्ण : 599 
मृत्यू : 1 हजार 726 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोलापूर जिल्हा : 

कोरोनाबाधित रुग्ण : 46 हजार 500 
बरे झालेले रुग्ण : 42 हजार 952 
उपचार सुरू असलेले रुग्ण : 1 हजार 931 
मृत्यू : 1 हजार 617 
 
सांगली जिल्हा : 
कोरोनाबाधित रुग्ण : 46 हजार 952 
बरे झालेले रुग्ण : 44 हजार 851 
उपचार सुरू असलेले रुग्ण : 400 
मृत्यू : 1 हजार 701 

कोल्हापूर जिल्हा : 
कोरोनाबाधित रुग्ण : 49 हजार 132 
बरे झालेले रुग्ण : 47 हजार 157 
उपचार सुरू असलेले रुग्ण : 288 
मृत्यू : 1 हजार 687 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune division corona patient recovery rate on 94 percentage