Pune Teachers Constituency
sakal
भारत नागणे
पंढरपूर,: पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक तोंडावर आली असून या मतदारसंघात सध्या इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विद्यमान आमदारांच्या कारभारावर नाराजी असतानाच नव्या चेहऱ्यांच्या एन्ट्रीने निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे.
विशेष म्हणजे शिक्षक मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी सध्या आदर्श शिक्षक पुरस्कार वाटपाची चढाओढ लागल्याचे चित्र आहे. गावोगावी, तालुक्यात पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन करून शिक्षकांना खुश करण्याचा प्रयत्न इच्छुक उमेदवारांकडून सुरू आहे.