
Thieves Strike Pune Homes, Flee with Valuables Worth Six Lakh
Sakal
पुणे : दिवाळीच्या सणासुदीत शहरात चोरट्यांनी बंद घरे आणि दुकाने लक्ष्य करत घरफोड्या केल्याच्या घटना घडल्या. मंगळवार पेठ, सिंहगड रस्ता, वाघोली आणि एनआयबीएम रस्ता परिसरात झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला.