
Pune Firecracker Accident
Sakal
पुणे : पुण्यात अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असलेल्या नेपाळची २० वर्षीय तरुणी मधुमिता (नाव बदललेले) तरुणीच्या दोन्ही डोळ्यांना शोभेचा फटाका पेटवताना इजा झाली. हा फटाका पेटवल्यानंतर तो प्रथम तिच्या चेहऱ्यावर आला व नंतर आकाशात गेला. यामुळे तिच्या दोन्ही डोळ्यांच्या बुबुळांना इजा झाली असून तिची दृष्टीही कमी झाली आहे. या तरुणीवर सिंहगड रस्त्यावरील माणिक बागेतील दुधभाते नेत्रालय येथे उपचार करण्यात आले.