
Pune's bullion market witnesses a massive price surge this Diwali
Sakal
पुणे : दिवाळीचा उत्साह वाढत असताना सराफ बाजारात सोन्याबरोबरच चांदीनेही तेज दाखवले आहे. गेल्या दहा दिवसांतील आकडे पाहता चांदीच्या भावाने मोठी झेप घेतली आहे. ११ ऑक्टोबरला प्रति किलो १ लाख ६६ हजार रुपये असलेली चांदी १४ ऑक्टोबरला तब्बल १ लाख ८३ हजार रुपयांवर पोहोचली आहे. केवळ तीन दिवसांत तब्बल १७ हजार रुपयांची वाढ झाली. त्यानंतर काही दिवस किंचित घट झाली असली तरी १९ आणि २० ऑक्टोबरपर्यंत भाव पुन्हा १ लाख ७१ हजार रुपयांच्या आसपास स्थिरावले आहेत.