

पुणे, ता. २५ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती भागातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागल्याने छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता यासह प्रमुख रस्त्यांवर शनिवारी आणि रविवारी जड वाहनांना असलेली वाहतुकीची परवानगी तात्पुरती रद्द करण्यात आली आहे.
वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी याबाबत आदेश दिले आहेत. दिवाळी संपेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार असून नागरिकांची गर्दी आणि वाहतुकीची स्थिती लक्षात घेऊन त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांच्या वाहतुकीवर यापूर्वीच निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र, बांधकाम साहित्याची वाहतूक करणारी तसेच अन्य मालवाहू जड वाहनांना शनिवार आणि रविवारी काही प्रमुख रस्त्यांवरून वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली होती. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती भागात होणारी गर्दी लक्षात घेऊन ही सवलत आता रद्द करण्यात आली आहे.
पर्यायी मार्गांचा वापर करा
दिवाळीनिमित्त पुणे शहरासह उपनगर आणि जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येतात. विशेषतः शनिवारी आणि रविवारी या परिसरातील रस्त्यांवर पादचाऱ्यांची आणि वाहनांची मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याबरोबरच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवर शनिवार आणि रविवारी जड वाहनांच्या वाहतुकीस देण्यात आलेली परवानगी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित जड वाहनचालकांनी या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.