Doctor Lured for Medical Checkup and Robbed
पुणे : वैद्यकीय तपासणीच्या बहाण्याने बोलावून चोरट्यांनी एका डॉक्टरला चाकूचा धाक दाखवून दागिने, रोकड असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज लुबाडून नेला. ही घटना पुणे-सातारा रस्त्यालगत होंडा शोरूमच्या बाजूला घडली. याप्रकरणी बालाजीनगर, धनकवडी येथील एका ४९ वर्षीय डॉक्टरने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.