'हे' आहे पुण्यातील 'टॅलेंटेड' गाढव!

दिलीप कुर्‍हाडे
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

येरवडा : बावधन येथील रेस्क्यू फाउंडेशन प्राणी सहायता केंद्रातील एक मादी गाढव आनंद झाला की चक्क गाणे गाते. तिला पालक, गाजर खायला दिले की ते आनंदी होऊन गाणे गाते. हे गाणारे गाढव पाहण्यासाठी पुणेकरही गर्दी करीत आहेत.

रेस्क्यू प्राणी मित्र संस्थेच्या संचालिका जेसिका रॉबिन्स्‌ म्हणाल्या, ‘‘काही महिन्यांपूर्वी गर्भवती असलेलं एक मादी गाढव रस्त्यावर अतिशय बिकट परिस्थितीत सापडले होते. गाढवाने रस्त्यावरच एका पिल्लाला जन्म दिला होता. मात्र, ते जगले नाही. ती अतिशय अशक्त व पिल्लू मेल्यामुळे ती आक्रमक झाली होती. ती कुणालाही जवळ फिरकू देत नव्हती. खूप प्रयत्नानंतर संस्थेने गाढवाला शांत केले. तिच्यावर योग्य उपचार केले. संस्थेने या गाढवाला प्रेमाने एमिली असे नाव ठेवले.’

काही दिवसानंतर एमिली पूर्णपणे बदलली. ती तिच्या सवंगड्यांसोबत खेळते. विशेष म्हणजे तिला पालक, गाजर खूप आवडते. ते तिला कुणी खाऊ घातले तर ती खूश होऊन चक्क गायला सुरवात करते. यामागे कोणतेही शास्त्रीय कारण देता येत नाही. पण जेव्हा तिला आनंद होतो, तेव्हा ती रेकण्यासोबत गाऊही लागते, असे रॉबिन्स यांनी सांगितले.

Web Title: In Pune Donkeys Sings song