Pune : कात्रजमधील डीपी रस्ते कागदावरच; नागरिकांचे वाहतूककोंडीने हाल

प्रशासन विकास आराखड्याबाबत उदासीन, प्रशासनाला मागील ११ वर्षात कोणत्याही रस्त्याचा पूर्ण विकास करता आला नाही
Pune Development
Pune DevelopmenteSakal

कात्रज - २००२च्या विकास आराखड्यातील रस्ते मागील ११ वर्षांपासून विकसित झाले नसून ते केवळ कागदावरच आहेत. अनेक ठिकाणी रस्ते अरुंद असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे परिसराचा विकास खुंटला असून राज्य सरकारकडून या विकास आराखड्याला २०१२मध्ये अंतिम मंजुरी देण्यात आली.

Pune Development
Pune Crime : पुण्यात वाहनांची तोडफोड सत्र सुरूच, पाच जणांना अटक

मात्र, प्रशासनाला मागील ११ वर्षात कोणत्याही रस्त्याचा पूर्ण विकास करता आला नाही. काही रस्त्यावर तुकड्या-तुकड्यात जागा ताब्यात घेण्यात आली असून त्याचा उपयोग वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी होत नाही. त्यामुळे परिसरातील डीपी रस्ते विकसित करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

२००२ मध्ये पहिल्यांदा हा विकसन आराखडा नागरिकांसमोर मांडण्यात आला. त्यानंतर २००५पर्यंत प्रशासनांकडून यावर हरकती घेण्यात आल्यानंतर २०१२मध्ये या विकसन आरखड्याला राज्य सरकारकडून अंतिम मंजुरी देण्यात आली.

मात्र, परिस्थिती 'जैसे थे' आहे. उलट जुन्या रस्त्यांवर वाढत्या नागरिकीकरणाचा ताण येत आहे. तसेच, रस्त्यांच्या जागांवर अनेक ठिकाणी बांधकामे झाली आहेत. बांधकामे झाल्यावर जागा ताब्यात घेणे अवघड होते, त्यासाठी बांधकामे होण्याआधीच महापालिकेकडून जागा ताब्यात घेत रस्ते विकसित करण्याची मागणी होत आहे.

Pune Development
Mumbai Accident : दुकानासमोर असलेल्या लोखंडी जाळीमुळे होत आहेत दुर्घटना; कारवाईची उल्हासनगर महानगरपालिकाकडे नागरिकांची मागणी

कात्रज चौक आणि तलाव परिसरावर ताण

कात्रज तलावाशेजारून जाणारा १८ मीटर रुंदीचा रस्ता, वरखडेनगरमधील १२ मीटर रुंदीचे दोन रस्ते, माऊलीनगर ते (शेलारमळा मार्गे) गुजरवाडी रस्त्यादरम्यान असणारा ९ मीटर रुंदीचा रस्ता, सातारा रस्ता (गुजरवाडी फाटा) ते वरखडेनगर हा १८ मीटर रुंदीचा रस्ता विकसित करण्याची गरज असताना ते झालेले नाहीत.

Pune Development
Mumbai Accident : दुकानासमोर असलेल्या लोखंडी जाळीमुळे होत आहेत दुर्घटना; कारवाईची उल्हासनगर महानगरपालिकाकडे नागरिकांची मागणी

हे रस्ते विकसित झाल्यास गुजर-निंबाळकरवाडीला जाणारी किंवा सातारा रस्त्यावरून कोंढवा रस्त्यावर येणारी वाहतूक वळविता येऊ शकते. मात्र, आता ही वाहतूक कात्रज चौकातून आणि कात्रज तलावाजवळील अरुंद रस्त्यावरुन येत असल्याने दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. हे रस्ते विकसित झाल्यास कात्रज चौक, आणि तलाव परिसरातील वाहतूककोंडी कमी होईल.

माऊलीनगरवरून सुखासागरनगर परिसरात जाणारा १२ मीटर रुंदीचा रस्ता अर्धवट विकसित करण्यात आला आहे. जागांमालकांकडून जागा ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न दिसत नाहीत. तसेच, राजस सोसायटी (महावीरनगरमार्गे) ते पॅरामाऊंट गार्डन हा पूर्व-पश्चिम रस्ता तुकड्यातुकड्यांनी ताब्यात घेण्यात आला असून तो पूर्ण रस्ता खुला केल्यास कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल.

Pune Development
Mumbai : अधिवेशन चहापान पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेता कोण ?

प्रतिक्रिया

विकास आराखडा तयार होऊन पूर्ण मान्यता येण्यास १० वर्षे लागली. त्यानंतर आता ११ वर्षे उलटली तरी कुठलाही रस्ता पूर्ण विकसित करण्यास प्रशासनाला आलेले अपयश हे त्यांची कार्यक्षमता दर्शविणारे आहे.

किमान, मागील दीड वर्षापासून असलेले प्रशासकीयराजमध्ये तरी विकास आराखड्यावर काम होणे गरजेचे होते. यापुढील काळाततरी हे रस्ते विकसित करण्यावर भर द्यावा ही मागणी आहे - दीपक गुजर, स्थानिक नागरिक

Pune Development
Mumbai Accident : दुकानासमोर असलेल्या लोखंडी जाळीमुळे होत आहेत दुर्घटना; कारवाईची उल्हासनगर महानगरपालिकाकडे नागरिकांची मागणी

सद्यस्थितीत आपण कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. याचा दररोज दोन लाख लोकांना फायदा होणार आहे. त्यानंतर या रस्त्याला जोडले जाणारे विकसन आराखड्यातील रस्ते हे भूसंपादनामुळे किंवा कायदेशीर बाबीत अडकले आहेत,

त्यावर काम सुरु केले असून कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरण पुर्णत्वाकडे जात असताना आजूबाजूचे सर्व रस्ते विकसित होतील, यानुसार आमचे काम सुरु आहे. लवकरच हे पूर्णत्वाकडे जाईल.

विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com