

Dr. Ajay Chandanwale Takes Charge as MUHS Vice-Chancellor and DMER Director
Sakal
पुणे : राज्य शासनाने वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांची नियुक्ती ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (एमयुएचएस) या संस्थेच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती पुढील सहा महिन्यांसाठी असेल. याबाबतचा आदेश ‘एमयुएचएस’ चे कुलपती आचार्य देवव्रत यांनी जारी केल्यानंतर त्यावरून राज्यपाल कार्यालयाचे सचिव प्रशांत नारनवरे यांनी गुरुवारी (ता. २३) आदेश निर्गमित केले आहेत. डॉ. चंदनवाले यांच्याकडे ‘एमयुएचएस’ च्या कुलगुरू पदाबरोबर वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक (डीएमईआर) या पदाचीही धुरा असणार आहे.