डॉ. आंबेडकर उड्डाणपूलाखाली अवैद्य धंद्यांना पेव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime in Pune

नेहरू रस्त्यावरील डॉ आंबेडकर उड्डाणपुलाच्या खाली हातभट्टी अवैद्य धंद्याना पेव आला असून, अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.

Pune News : डॉ. आंबेडकर उड्डाणपूलाखाली अवैद्य धंद्यांना पेव

महर्षी नगर - नेहरू रस्त्यावरील डॉ आंबेडकर उड्डाणपुलाच्या खाली हातभट्टी अवैद्य धंद्याना पेव आला असून, अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. सायंकाळ च्या सुमारास पिशव्या पडलेले दिसतात यावर पोलीस यंत्रणा काहीच करत नसल्याचे चित्र आहे. इंदिरा नगर भागात असंख्य मद्यपिंचा गर्दी करून सायंकाळच्या सुमारास आरडाओरडा सुरू असतो. याकडे देखील पोलीस प्रशासनाने लक्ष देणे महत्वाचे आहे. असुरक्षितता वाटणारा हा परिसर जर शांत झाला नाही तर आंदोलन करू, दारू हातभट्टी मुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. अवैद्य धंदा बंद करण्याची मागणी आम्ही करत आहोत असे येथील स्थानिक महिलांनी नाव न देण्याच्या अटीवर सांगितले.

या ठिकाणी प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

नेहरू रस्ता, सातारा रस्ता या दोन्ही उड्डाणपुलाखाली सायंकाळी मोठ्या प्रमाणात गर्दी असते, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. दुभाजकाच्या मध्यभागी असणाऱ्या जागेत महापालिकेने झाडे लावली होती, त्यांना योग्यरित्या पाणी पुरवठा न झाल्याने झाडे वाळली आहेत. स्थानिक नागरिक येथे कचरा टाकत असल्याने उड्डाणपूलाचे सौंदर्य हरवले आहे, आजूबाजूला कचऱ्याचे साम्राज्य, रस्त्याच्या दोन्ही बाजूस लागणारे वाहने यामुळे वाहतुकीची समस्या देखील जाणवू लागली आहे. सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे, बस ला जाण्यासाठी दररोज कसरत करावी लागते.

आम्ही नियमितपणे कारवाई करत असतो, कचरा टाकणाऱ्यावर आम्ही दंडात्मक कारवाई केली आहे, इथून पुढे या भागात विशेष लक्ष ठेवण्यात येईल - विक्रम काथवटे, आरोग्य विभाग, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय

महिन्यातून अनेक वेळा या भागात कारवाई होत असते, महिलांच्या तक्रारी आल्या तर कारवाई करू अशी भूमिका स्वारगेट पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी सांगितले.