Pune Drought: दहा तालुक्यांतील ३.१८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव

Pune Drought Compensation: खरीप हंगामातील दुष्काळामुळे पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांमधील ३ लाख १८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बाधित ४ लाख ७७ हजार ८४२ शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे ४६७.७० कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे.
Drought-hit farmers in Pune district face extensive crop losses during the Kharif season.

Drought-hit farmers in Pune district face extensive crop losses during the Kharif season.

esakal

Updated on: 

पुणे : खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यांनुसार, जिल्ह्यात सुमारे ३ लाख १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, सुमारे ४ लाख ७७ हजार शेतकरी बाधित झाले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने ४६७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली आहे.

Loading content, please wait...