

Drought Conditions in Indapur Leave Farmers Struggling to Save Crops Amid Rising Water Scarcity
esakal
पुणे : कोरड्याठाक आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या पुणे जिल्ह्यातील बळिराजाच्या नशिबी पुन्हा एकदा दुष्काळाचे चटके आले आहेत. ‘जमीन भेगाळली, करपली पिके’ ही केवळ म्हण राहिली नसून, हेच वास्तव जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये दिसत आहे. शासनाने काही तालुक्यांत दुष्काळ जाहीर करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला, पण शासकीय निकषांच्या रेषेपलीकडील तालुक्यांमध्येही परिस्थिती रत्तीभरही वेगळी नाही. तिथेही तहानलेल्या जमिनीला भेगा पडल्या आहेत आणि माना टाकलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी दाखवत आहेत. एकाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये मदतीवरून झालेली ही विभागणी प्रशासकीय उदासीनता, नैसर्गिक आपत्तीची तीव्रता एकाच वेळी अधोरेखित करत आहे.