
Stop Fake Medicines at the Source
Sakal
पुणे : अनेक आजारांवर गोळ्या – औषधे यांची निर्मिती करणाऱ्या नामांकित नसलेल्या काही कंपन्या काही रुपयांच्या नफ्यासाठी निकृष्ट औषधे बनवतात. ही औषधे घेतल्याने त्याचा रुग्ण बरा होत नाही. काही तर काही कंपन्या दिसायला औषधांसारखे असणारे मात्र, मानवी शरीराला हानिकारक असणारे घटक मिसळून जिवाशी खेळतात. मात्र, त्याची सजा ही औषध विक्रेत्यांना मिळते असे त्यांचे मत आहे. असे बनावट औषधे जर त्यांच्याकडे सापडले तर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) जप्त केले जाते व त्याचा भुर्दंड विक्रेत्यांवर पडतो. त्यामुळे, औषधांच्या गुणवत्तेबाबत ‘एफडीए’ व त्यांना परवानगी देणाऱ्या यंत्रणेनेच ही औषधे बाजारात येण्याआधीच रोखायला हवीत, अशी भूमिका औषध विक्रेत्या संघटनांनी घेतली आहे.